Idol Dahi Handi 2025 : दादरच्या आयडियल बुक डेपोजवळच्या दहीहंडीसाठी महिला गोविंदांची झुंबड
राज्यभरात गोकुळआष्टमी आणि दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतोय. अशातच मुंबई, ठाणे, दादर येथे लक्ष वेधून घेणाऱ्या उंच उंच दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकं देखील सज्ज झाले आहेत.
दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबई, ठाणे परिसरात लाखो रुपयांचे पारितोषिक असलेल्या उंचच उंच दहीहंडी बांधण्यात आल्या आहेत. या उंच दहीहंड्या फोडण्यासाठी दहीहंडी पथक सज्ज झाले असून त्यांच्या चुरस रंगणार असल्याचे दिसतंय आहे. कारण पुरूष महिला पथकांसोबत यंदाही महिला गोविंदा पथकांचा मोठा सहभाग पाहायला मिळत आहे. ‘गो गो गो गोविंदा… गोविंदा रे गोपाळा, यशोदेच्या तान्ह्या बाळा…’ असा जयघोष सध्या संपूर्ण मुंबईसह ठाणे, नवी मुंबईमध्ये कानी घुमतांना दिसतो. यंदाही दादर पश्चिम येथील आयडियल बूक डेपो जवळच्या साई दत्त मित्र मंडळ आयोजित दहीहंडी उत्सवात महिला गोविंदा मोठ्या संख्येने दाखल झाल्याचे पाहायला मिळत आहे. या ठिकाणी दरवर्षी महिला दहीहंडी, अंध व्यक्तींची दहीहंडी, दिव्यांगांची दहीहंडी उत्साहात साजरी होताना पाहायला मिळतेय. बघा यंदा दादर पश्चिम येथील आयडियल बूक डेपो जवळच्या साई दत्त मित्र मंडळ आयोजित दहीहंडीचा कसा आहे उत्साह?
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

