“संभाजी भिंडे यांनी शिवप्रतिष्ठानचं काम सोडून राजकीय भाष्य करू नये”, ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावर दीपक केरसकर यांचा सल्ला
शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्या पाठोपाठ पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबाबतही वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळे ते चांगलेच वादात सापडले आहेत. त्यावर आता शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी संभाजी भिडे यांना सल्ला दिला आहे.
नाशिक, 30 जुलै, 2023 | शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्या पाठोपाठ पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबाबतही वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळे ते चांगलेच वादात सापडले आहेत. काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत संभाजी भिडे यांच्या अटकेची मागणी केली आहे. त्यावर आता शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी संभाजी भिडे यांना सल्ला दिला आहे. ते म्हणाले की, “संभाजी भिडे यांनी शिवप्रतिष्ठानचं काम सोडून राजकीय भाष्य करू नये.त्यांनी राजकीय प्रश्नांवर भाष्य करणे थांबवावे. संभाजी भिडे यांच्या वयामुळे ते असं बोलत असतील. गृहमंत्री यांनी सांगितले आहे की, आम्ही त्यांचं वक्तव्य तपासून पाहू. माझी जर भेट झाली, तर मी स्वत: त्यांना सांगेल,त्यांच्या अशा वक्तव्यामुळे देशाला दुःख होतं. त्यांनी इतर विषयांवर भाष्य करू नये, अशी माझी नम्र विनंती आहे.”
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली

