Delhi CJP Protest : बॅरिकेटिंग, RAF तैनात अन् पोलिसांचा बंदोबस्त; जंतरमंतरवर आंदोलनाआधीच CJP नेत्यांना रोखलं
दिल्लीतील जंतरमंतर येथे सीजेपीच्या नेत्यांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. आशुतोष रांका, सौरभ दास, आणि अजिंक्य शिंदे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना जंतरमंतरजवळच रोखण्यात आले. जंतरमंतर हे आता आंदोलनस्थळ नसतानाही सीजेपीने आक्रमक भूमिका घेतली असून, परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे.
दिल्लीतील जंतरमंतर येथे सीजेपी (CJP) या संघटनेच्या नेत्यांनी आज सकाळी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना जंतरमंतरकडे जाण्यापासून रोखत ताब्यात घेतले. आशुतोष रांका, सौरभ दास आणि अजिंक्य शिंदे हे आपल्या काही सहकाऱ्यांसह गाडीतून जंतरमंतरच्या दिशेने जात असताना, गेटजवळच दिल्ली पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
गेल्या काही दिवसांपासून जंतरमंतर हे आंदोलन स्थळांच्या यादीतून वगळण्यात आले असल्याची चर्चा असतानाही, सीजेपीच्या नेत्यांनी जंतरमंतरवरच आंदोलन करण्याचा आक्रमक पवित्रा घेतला होता. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी परिसरातील सुरक्षा व्यवस्था मोठ्या प्रमाणावर वाढवली आहे. जंतरमंतरच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यांवर अनेक ठिकाणी बॅरिकेटिंग करण्यात आले असून, रॅपिड ॲक्शन फोर्सचे जवानही तैनात आहेत. आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्यासाठी बसेसची देखील व्यवस्था करण्यात आली आहे.
Published on: Oct 13, 2026 11:39 AM
बॅरिकेटिंग, RAF तैनात अन् पोलिसांचा बंदोबस्त; जंतरमंतरवर आंदोलनाआधीच..
आंदोलनं दडपली तर...; संजय राऊतांचा केंद्र सरकारला इशारा, म्हणाले...
आशुतोष रांका, सौरव दास यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं
बँकेत कर्मचारी केक कापण्यात व्यस्त, शेतकरी मात्र...; व्हिडिओ व्हायरल

