Delta Air Lines Accident Video : 80 प्रवाशांना घेऊन जाणारं प्लेन क्रॅश, लॅडिंगदरम्यानचा अपघाताचा व्हिडीओ व्हायरल
डेल्टा एअर लाईन्सच्या विमानाच्या या अपघाताच्या घटनेत 17 प्रवासी जखमी झाले आहेत. या 17 प्रवाशांपैकी तीन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. एंडव्हर एअरचं विमान कॅनडाच्या सर्वात मोठ्या महानगरात उतरत होतं त्यावेळी हा अपघात झाला.
कॅनडा येथील टोरंटोच्या पीयर्सन आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक मोठा विमान अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. विमान लॅडिंगदरम्यान, डेल्टा एअरलाईन्सचे एक विमान क्रॅश झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 80 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानाचा अपघात झाला आहे. डेल्टा एअर लाईन्सच्या विमानाच्या या अपघाताच्या घटनेत 17 प्रवासी जखमी झाले आहेत. या 17 प्रवाशांपैकी तीन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. एंडव्हर एअरचं विमान कॅनडाच्या सर्वात मोठ्या महानगरात उतरत होतं त्यावेळी हा अपघात झाला. विमान क्रॅश झाल्यानंतर तातडीने आपत्कालीन पथकांकडून बचाव कार्य सुरू करण्यात आलं. अपघातस्थळावरील व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये बर्फाळ जमिनीवर हे विमान लँड होताना दिसत आहे. तर अचानत त्या विमानातून धूर देखील निघत असल्याचे निदर्शनास आले आणि अचानक आग लागली. यावेळी सर्वत्र काळा दूर देखील पसरल्याचे पाहायला मिळाले.

IPL बघणं महागात पडलं; एसटी प्रशासनाने चालकाला थेट बडतर्फच केलं

'.. तर गावबंदी करू', मल्हार सर्टिफिकेटला जेजूरीच्या ग्रामस्थांचा विरोध

'मला शरद पवारांनी मंत्री केलं..', खतगावकरांचं अजितदादांसमोरच विधान

'तो आमचा विठ्ठल..' धाराशीवात खोक्याच्या समर्थनार्थ आदिवासी समाज एकवटला
