AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकीकडे राजीनाम्याची मागणी तर कॅबिनेटमध्ये छगन भुजबळ यांच्यावरून चर्चा अन् दिली तंबी?

एकीकडे राजीनाम्याची मागणी तर कॅबिनेटमध्ये छगन भुजबळ यांच्यावरून चर्चा अन् दिली तंबी?

Harshada Shinkar
Harshada Shinkar | Updated on: Nov 30, 2023 | 11:33 AM
Share

आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेल्या मंत्री छगन भुजबळ यांना आता राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजीनामा मागितला. आधी राजीनामा द्या नंतर बोला असं वक्तव्य विखे पाटील यांनी केलंय. यासंदर्भातच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूचना

मुंबई, ३० नोव्हेंबर २०२३ : आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेल्या मंत्री छगन भुजबळ यांना आता राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजीनामा मागितला. आधी राजीनामा द्या नंतर बोला असं वक्तव्य विखे पाटील यांनी केलंय. यासंदर्भातच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूचना दिल्यात. भाजपच्या मंत्र्यांनी छगन भुजबळ यांच्या मंत्रिपदाचा थेट राजीनामा मागितलाय. दरम्यान, विखे पाटील यांनी भुजबळांचा राजीनामा मागितल्यानंतर जरांगे पाटील यांनीही त्यांच्यावर बोचरी टीका केली आहे. पदाला चिकटून बसणारे भुजबळ काय राजीनामा देणार? असे ते म्हणाले. निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या नेतृत्वात मराठ्यांच्या कुणबी नोंदी शोधण्याचं काम सुरू आहे. मात्र याच समितीवर आक्षेप घेत समितीच बरखास्त करा आणि दाखल्यांना स्थगिती द्या, अशी मागणीही केली आहे. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Nov 30, 2023 11:33 AM
Follow Us