Devendra Fadnavis : प्रकरण 2014 सालचं, फडणवीस यांना कोर्टाची पायरी 2023 मध्ये चढावी लागणार
2014 साली झालेल्या विधानसभा निवडणुकांसाठी दाखल केलेल्या शपथपत्रात त्यांनी एका प्रकरणाची माहिती लपवल्याच्या आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. त्यानंतर याप्रकरणी न्यायालयात सुनावणी पार पडली असून त्यांना यांना प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयापुढे उपस्थित राहावे लागणार आहे
नागपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना न्यालायलयाची पायरी चढावी लागणार आहे. याबाबत बातमी येताच भाजपसह राज्यात खळबळ उडाली आहे. तर 2014 साली झालेल्या विधानसभा निवडणुकांसाठी दाखल केलेल्या शपथपत्रात त्यांनी एका प्रकरणाची माहिती लपवल्याच्या आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. त्यानंतर याप्रकरणी न्यायालयात सुनावणी पार पडली असून त्यांना यांना प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयापुढे उपस्थित राहावे लागणार आहे. तर देवेंद्र फडणवीस यांना आज 15 एप्रिल रोजी होणाऱ्या सुनावणीस उपस्थित राहावे लागणार आहे. मात्र राज्यातील विविध कामांकडे पाहता त्यांचे वकील बाजू मांडू शकतात, असेही सांगितलं जाते. याप्रकरणी अॅड. सतीश उके यांनी फडणवीस यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी तक्रार केली होती.
मोठी खळबळ! राजकारणातील कट्टर वैरी येणार एकत्र? बच्चू कडू आणि रवी राणा
शरद पवारांची कुटुंबातील सदस्यांसोबत क्लोज डोअर बैठक होणार
एका महिन्यानंतर पुन्हा रुपाली चाकणकर ॲक्टिव्ह मोडवर, नवी अपडेट समोर
बापरे! अशोक खरातच्या कार्यालयातून मिळाले 35... धक्कादायक माहिती समोर

