देवेंद्र फडणवीसांचा शपथविधीपूर्वी शरद पवारांना फोन, काय झालं बोलणं?
महायुतीच्या शपथविधी सोहळ्यात देवेंद्र फडणवीस हे राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. मात्र या शपथविधी सोहळ्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे.
महायुती सरकारचा भव्य शपथविधी सोहळा आज मुंबईतील आझाद मैदानावर पार पडणार आहे. या शपथविधी सोहळ्यात देवेंद्र फडणवीस हे राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. मात्र या शपथविधी सोहळ्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना फोन केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. मात्र आज होणाऱ्या शपथविधीला उपस्थित राहण्याचं निमंत्रण देण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना फोनवरून दिल्याचे सांगितले जात आहे. मात्र, शरद पवार आजच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत. संसदेचं अधिवेशन सुरू असल्यानं शरद पवार शपथविधीला उपस्थित राहणार नसल्याचं शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांनी कळवलं. विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे. मुंबईतील आझाद मैदानावर फडणवीस सरकारचा शपथविधी होणार आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबतच इतर काही राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.
Published on: Dec 05, 2024 12:53 PM
आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा मामांना टोला
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा पवारांना फोन; भेटून सविस्तर बोलू..
