Devendra Fadnavis | ओबीसींचं राजकीय आयुष्य संपवण्याचा घाट, देवेंद्र फडणवीसांचा आरोप

राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचं आरक्षण नाकर्तेपणामुळे, महाराष्ट्रातील ओबीसींचं राजकीय आरक्षण संपलं,असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचं आरक्षण नाकर्तेपणामुळे, महाराष्ट्रातील ओबीसींचं राजकीय आरक्षण संपलं. त्यानंतर राज्य सरकारने वारंवार आश्वस्त करुन याबाबत कारवाईचं आश्वासन दिलं. ओबीसी मंत्र्यांनी परवा घोषित केलं की निवडणुका होऊ देणार नाही, आणि त्यानंतर दुसऱ्याच दिवशी या निवडणुका जाहीर होतात, हा एक प्रकारचा ओबीसी समाजाचा विश्वासघात आहे. ओबीसींचं राजकीय आरक्षण संपवण्याचा घाट सरकारकडून घातला जातोय. हे आम्ही सहन करणार नाही. कुठल्याही परिस्थितीत सरकारने हस्तक्षेप करुन या निवडणुका रद्द केल्या पाहिजेत. या निवडणुका रद्द केल्या नाहीत तर उग्र आंदोलन भाजप करेल, असा इशारा मी राज्य सरकारला देतोय. कुठल्याही परिस्थितीत ओबीसींचा विश्वासघात बंद करा, असं माझं राज्य सरकारला आवाहन आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI