Special Report । महिला आरक्षणावरून फडणवीस–सुळे आमनेसामने; सीरियल लायर म्हणत, मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल
महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यात सत्ताधारी आणि महाविकास आघाडी आमनेसामने आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. लोकसभेत महिला आरक्षणाऐवजी मतदारसंघ पुनर्रचनेचं विधेयक आणल्याची टीका विरोधकांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल करत त्यांना “सिरीयल लायर” अशी उपमा दिली. त्यांनी आरोप केला की, लोकसभेत विरोधकांनीच घटना दुरुस्तीचं विधेयक पाडलं आणि आता महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून दिशाभूल केली जात आहे.

दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी 2023 मध्ये महिला आरक्षण विधेयक मंजूर झाल्यानंतरही त्याची अंमलबजावणी का झाली नाही, असा सवाल उपस्थित केला आहे. या मुद्द्यावरून दोन्ही नेत्यांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं की, 2023 च्या विधेयकानुसार महिला आरक्षण लागू करण्यासाठी मतदारसंघांची पुनर्रचना (डिलिमिटेशन) आणि जनगणना आवश्यक आहे. 2024 पर्यंत जनगणना न झाल्यामुळे केंद्र सरकारला सुधारित विधेयक आणावं लागलं, असा दावा त्यांनी केला. त्यामुळे या मुद्द्यावरून राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
Published on: Apr 22, 2026 11:06 AM
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi