AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब

भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब

| Updated on: Dec 04, 2024 | 12:10 PM
Share

आज भाजपकडून विधिमंडळ गटनेता निवडण्याची महत्त्वाची बैठक विधीमंडळात पार पडली. याच भाजप पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालाय

भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब कऱण्यात आला आहे. म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांची विधीमंडळाचा नेता म्हणून निवड करण्यात आली. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार असल्याचं हे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीमधील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी आपापल्या विधिमंडळ गट नेत्याची निवड केली होती. मात्र विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळालेला आणि सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपकडून विधिमंडळ गटनेता निवडण्यात आला नव्हता. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर आज भाजपकडून विधिमंडळ गटनेता निवडण्याची महत्त्वाची बैठक विधीमंडळात पार पडली. याच भाजप पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर विधीमंडळाचा नेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली. विधिमंडळ गटनेता निवडण्याची महत्त्वाच्या बैठकीपूर्वी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीत भाजपचे वरिष्ठ नेते, केंद्रीय निरीक्षक विजय रुपाणी आणि निर्मला सीतारमण हे हजर होते. यावेळी गटनेतेपदासह विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.

Published on: Dec 04, 2024 12:10 PM
Follow Us