रंजना नागपूरकरांचे धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप
मनोज जरांगे यांच्या आधीच्या सुतोवाचानंतर रंजनना नागपूरकर यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पतीला सेवेत पुन्हा रुजू करण्याकरिता मुंडे यांनी १७ लाख रुपये घेतल्याचा दावा नागपूरकर यांनी केला आहे. या आरोपांवर मुंडे समर्थकांनी सत्यता पडताळण्याची मागणी करत विनाकारण बदनामी टाळण्याचे आवाहन केले आहे.
नागपूरच्या रंजना नागपूरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मनोज जरांगे यांनी यापूर्वीच याबाबत सूतोवाच केले होते, त्यानंतर आता स्वतः रंजनना नागपूरकर समोर आल्या आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, अनिल देशमुख गृहमंत्री असताना त्यांच्या पतीला सूडबुद्धीने निलंबित करण्यात आले होते. रश्मी शुक्ला यांचे रायटर वामन तितरमारे यांनी या कामात संगनमत केले. त्यानंतर, पतीला पुन्हा सेवेत रुजू करण्यासाठी धनंजय मुंडे यांनी १७ लाख रुपये घेतल्याचा आरोप रंजनना नागपूरकर यांनी केला आहे.
या आरोपांवर धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी रंजनना नागपूरकर यांना विनंती केली आहे की, या आरोपांची सत्यता पडताळून पाहावी आणि विनाकारण मुंडेंची बदनामी करू नये. सत्यता तपासण्यासाठी त्यांनी बीडला येण्याचे किंवा त्यांना बोलावण्याचे आवाहन केले आहे. तसेच, खोटे आरोप न करण्याचे आवाहनही समर्थकांनी केले आहे.
Published on: Feb 19, 2026 09:49 AM
एक, दोन नाही तब्बल 3000 गॅस सिलिंडर गेले वाहून, पूराच्या प्रावाहतच...
ममता बॅनर्जींचा पारा चढला, कार्यकर्त्याला चक्क कानशीलात लगावली, थेट...
एकनाथ शिंदेंच्या दालनातच राष्ट्रावादी शरद पवार गटाच्या आमदारांची बैठक,
रोहित पवार, विनायक राऊत यांनी घेतली जखमी डॉक्टरांची भेट
