अब तुमसे मिटने का खौफ नहीं..; धनंजय मुंडेंचा विरोधकांना टोला
धनंजय मुंडे यांनी एका कार्यक्रमात बोलताना विरोधकांवर ताशेरे ओढले आहेत.
मी चूकलो तर मला बदनाम करा. पण मी ज्या जातीत जन्मलोय त्या जातीला, माझ्या जिल्ह्याला बदनाम करू नका. महाराणापासून ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्ल्यांवर स्वराज्यासाठी अन्न धान्य पुरवणारा हा समाज आहे. दोष एका व्यक्तीचा असेल तर त्या व्यक्तीला फासावर लटकवा, पण समाज बदनाम करू नका, अशी थेट प्रतिक्रिया माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी एका कार्यक्रमात बोलताना दिली आहे.
यावेळी बोलताना धनंजय मुंडे पुढे म्हणाले की, दोष एका व्यक्तीचा असेल तर फाशी द्या मात्र समज्याला दोष देऊ नका. आजपर्यंत माझ्याकडून भाषणात चुकीचा शब्द गेला नाही. मराठा समाजाला जास्तीत जास्त आरक्षण मिळावं यासाठी भांगेसाहेबांनी ड्राफ्ट केला. अश्या परिस्थीतीत फक्त दम खा.. समाजाने हे लक्षात ठेवावं, असं म्हणत धनंजय मुंडे यांनी यावेळी शेरोशायरी देखील केली. जीवनातल सर्वात मोठ संकट आलं तेंव्हा समाज खंबीरपणे पाठिशी होता. विजय अभी बाकी हैं, मी 200 दिवस शांत होतो लोक म्हणायचे बोलत का नाही, मी म्हणल ज्याला ज्याला काय बोलायचं बोलू द्या, मी स्पष्टीकरण देणार नाही. ज्याची क्रिया मी केलीच नाही त्याची प्रतिक्रीया मी देणार नाही. मी मात्र गप्प होतो, न्याय व्यवस्थेनं न्याय दिला, असंही यावेळी धनंजय मुंडे यांनी म्हंटलं.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

