‘गर्जे’ल तो पडेल काय? सुषमा अंधारेंचा रोख कुणावर? ‘त्या’ सूचक ट्विटची चर्चा
विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान पार पडत आहे. तर 11 जागांसाठी तब्बल 12 उमेदवार रिंगणात आहेत. अशातच 'गर्जे'ल तो पडेल काय? असं सूचक ट्विट ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केलं आहे. दरम्यान, सुषमा अंधारे यांच्या सूचक ट्विटचा रोख अजित पवार गटाकडे आहे का? अशी चर्चा सुरू
विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान पार पडत आहे. तर 11 जागांसाठी तब्बल 12 उमेदवार रिंगणात आहेत. विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी गुप्त पद्धतीने मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी सत्ताधारी महायुतीने 9 उमेदवार उभे केले आहेत. तर विरोधी महाविकास आघाडीचे 3 उमेदवार रिंगणात आहेत. यात भाजपचे 5 उमेदवार पाहायला मिळत आहेत. अशातच ‘गर्जे’ल तो पडेल काय? असं सूचक ट्विट ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केलं आहे. दरम्यान, सुषमा अंधारे यांच्या सूचक ट्विटचा रोख अजित पवार गटाकडे आहे का? अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. शिवाजीराव गर्जे अजित पवार गटाचे उमेदवार असून यांच्या संदर्भातच सुषमा अंधारे यांचं ते सूचक ट्वीट आहे का? असा सवाल केला जात आहे. राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे हे दोन उमेदवार अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे आहेत. यासंदर्भातच सुषमा अंधारे यांनी हे सूचक ट्वीट केले असल्याचे म्हटले जात आहे.
Published on: Jul 12, 2024 12:44 PM
विकसीत महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल पुढे; CM फडणवीसांच्या हस्ते...
मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला प्रकाश आंबेडकरांचं...
अभिजीत दीपके भेटीवरून भाजपच्या बड्या नेत्यांची नाराजी; थेट...
विकास कामांसाठी... देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीला जाणार? भाजपच्या बड्या
