विधानसभेत गदारोळ! निधी वाटपावरून यशोमती ठाकूर आक्रमक; अजितदादा म्हणाले, “चष्मा बदला, मी भावाच्या नात्याने ओवाळणी देईन”
निधी वाटपाच्या मुद्द्यावरुन काल विधानसभेत चांगलाच गदारोळ झाला. उपमुख्यमंत्री अजित पवार निवेदन देताना काँग्रेसच्या आमदार आमदारांनी निधी वाटपावरुन आक्रमक भूमिका घेतली.
मुंबई, 26 जुलै 2023 | अजित पवार अर्थमंत्री होताच त्यांनी निधी वाटपात दुजाभाव केल्याचा आरोप विरोधक करत आहेत. काल याच मुद्द्यावरून विधानभवनात गदारोळ झाला. अजित पवार हे निवदेन देत असताना काँग्रेसने निधी वाटपावरून आक्रमक भूमिका घेतली. निधी वाटपावरून यशोमती ठाकूर आणि अजित पवार यांच्या खडाजंगी पाहायला मिळाली. यशोमती ठाकूर म्हणाल्या की, आम्हाला सावत्र वागणूक दिली जात आहे. निधीवाटपात सावत्र वागणूक का देता? असा सवाल त्यांनी अजित पवार यांना विचारला. तेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, मी अजिबात सावत्र वागणूक देत नाही. यशोमती ताई तुम्ही चष्मा बदला, मी तुम्हाला भावाच्या नात्याने ओवाळणी देईल, असे म्हणत उत्तर दिले. त्यानंतर देखील सभागृहातील गोंधळ काही थांबला नाही.
Published on: Jul 26, 2023 07:48 AM
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
