AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

'रोहिणी खडसेंनी नवऱ्याचं नाव अन् आडनाव लावून फिरावं मग...', रुपाली चाकणकरांचा पुन्हा निशाणा

‘रोहिणी खडसेंनी नवऱ्याचं नाव अन् आडनाव लावून फिरावं मग…’, रुपाली चाकणकरांचा पुन्हा निशाणा

Harshada Shinkar
Harshada Shinkar | Updated on: Sep 20, 2024 | 12:17 PM
Share

जळगाव दौऱ्यावर असलेल्या अजित पवार गट राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर आणि शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांच्यात सध्या शाब्दिक युद्ध रंगताना दिसयंतय. दोघेही एकमेकांवर बोचरी टीका करत असून एकेमकांवर पलटवार करत आहेत.

रोहिणी खडसे यांनी आपल्या नवऱ्याचं नाव आणि आडनाव लावून फिरावं. यानंतर रोहिणी खडसे यांना कोणी ओळखतंय का हे लक्षात येईल, असं वक्तव्य करत रूपाली चाकणकर यांनी पुन्हा एकदा रोहिणी खडसे यांच्यावर निशाणा साधला आहे. वडिलांच्या नावाने आम्ही राजकारण करत नाही. कोणत्याही स्थानिक पातळीवर कोणत्याही संस्था, संघटनेमधून निवडणुका न लढवता पाच वेळा ज्या मतदारसंघात वडील आमदार होते. असा सुरक्षित मतदारसंघात त्या निवडून येऊ शकल्या नाहीत. त्यांनी आता निवडणुका लढवताना आपल्या नवऱ्याचं नाव आणि आडनाव लावून फिरावं. मग त्यांना लक्षात येईल, आपली ओळख जनमाणसात किती आहे ते? असा सवाल रुपाली चाकणकर यांनी केला. त्या पुढे असेही म्हणाल्या, वडिलांच्या नावाने राजकारण करणाऱ्या आम्ही शून्यापेक्षा जास्त किंमत देत नाही. तर माझ्याकडे कर्तृत्ववान वडील असल्याचा मला अभिमान असल्याचे म्हणत रोहिणी खडसे यांनी रुपाली चाकणकर यांच्या टीकेवर पलटवार केलाय.

Published on: Sep 20, 2024 12:17 PM
Follow Us