Mahadev Munde Case : …त्यापेक्षा माझाच एन्काऊंटर करा मग विषयच क्लोज, पतीच्या न्यायासाठी ज्ञानेश्वरी मुंडे संतापल्या
आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत त्यांनी वेळ दिला नाही तरी तीन दिवसानंतर त्यांच्या बंगल्यापाशी जाऊन किमान दहा मिनिटं तरी आम्हाला वेळ द्या अशी विनंती करणार आहोत. मात्र मुख्यमंत्र्यांनी आम्हाला वेळ द्यावा अशी ही मागणी यावेळी बोलताना ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केली आहे.
ज्ञानेश्वरी मुंडे यांनी पती महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करण्याची पुन्हा मागणी केली. या मागणीसाठी दोन दिवसांपूर्वी बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यांच्यावर सध्या बीडच्या जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. दरम्यान बीड शहर पोलिसात त्यांच्यावर आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर त्यांनी बोलताना माझ्यावर गुन्हा दाखल करण्यापेक्षा पोलिसांनी माझा एन्काऊंटर करून टाकावा म्हणजे त्यांना कोणीही न्याय मागणार नाही अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. तर आज सकाळीच सुप्रियाताईंचं फोनवरून बोलणं झाल्याचंही ज्ञानेश्वरी मुंडे यांनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांना जर माझे लेकरं असे अनाथ करायचे नसतील तर त्यांनी याबाबत तात्काळ सांगितलं पाहिजे की आरोपी अटक करा, अशी विनंतीही ज्ञानेश्वरी मुंडे यांनी यावेळी केली.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक

