Sangli | सांगलीतल्या पुराची ड्रोन कॅमेऱ्यातली दृश्यं

सांगली जिल्ह्यात पूरस्थितीमुळे पूर्णत: बाधित 13, अंशत: बाधित 90 अशी एकूण 103 गावे बाधित आहेत. यामध्ये मिरज तालुक्यात महानगरपालिका क्षेत्र (शहरी) अंशत: 1 गाव बाधित आहे.

सांगली जिल्ह्यात पूरस्थितीमुळे पूर्णत: बाधित 13, अंशत: बाधित 90 अशी एकूण 103 गावे बाधित आहेत. यामध्ये मिरज तालुक्यात महानगरपालिका क्षेत्र (शहरी) अंशत: 1 गाव बाधित आहे. मिरज ग्रामीणमध्ये 3 गावे पूर्णत: तर 2 गावे अंशत: अशी 5 गावे बाधित आहेत. अप्पर सांगली (ग्रामीण) मध्ये 15 गावे अंशत: बाधित आहेत. वाळवा तालुक्यात वाळवा क्षेत्रातील 2 गावे पूर्णत: आणि 29 गावे अंशत: अशी एकूण 31 गावे बाधित आहेत. अपर आष्टा क्षेत्रातील 1 गाव पूर्णत: आणि 8 गावे अंशत: अशी एकूण 9 गावे बाधित आहेत. शिराळा तालुक्यात 1 गाव पूर्णत: तर 18 गावे अंशत: अशी एकूण 19 गावे बाधित आहेत. तर पलूस तालुक्यातील 6 गावे पूर्णत: आणि 17 गावे अंशत: अशी एकूण 23 गावे बाधित आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI