Satara Video : रिक्षाचालक फुल्ल टाईट…महिला पोलीस कॉन्स्टेबलला नेलं फरफटत, थरार CCTV मध्ये कैद, नेमकं घडलं काय?
साताऱ्यात रिक्षा चालकाने महिला पोलीस कॉन्स्टेबलला फरफटत नेल्याचा व्हिडीओ समोर आलाय. नेमका प्रकार काय ? बघा व्हिडीओ
साताऱ्यात एका रिक्षा चालकाने कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस कॉन्स्टेबलला फरफटत नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना साताऱ्यातील खंडोबा माळ ते मार्केट यार्ड परिसरात घडली असून, थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. साताऱ्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या खंडोबा माळपासून मार्केट यार्ड परिसरात घडलेल्या या घटनेनंतर एकच संताप व्यक्त करण्यात येतोय.
संबंधित घटनेत रिक्षा चालक हा दारूच्या नशेत होता. त्याला अडवण्याचा प्रयत्न केला असता, त्याने महिला पोलीस कर्मचाऱ्याला फरफटत नेले,असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेत महिला पोलीस कर्मचारी जखमी आणि चांगलीच रक्तबंबाळ झाली असून, तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या रिक्षा चालकाने मार्गात अनेक ६ ते ७ दुचाकी आणि चारचाकी गाड्यांना धडक दिल्याची माहिती आहे. नागरिकांनी या रिक्षा चालकाला पकडून चांगलाच चोप दिला, त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तर या घटनेमुळे साताऱ्यात खळबळ उडाली आहे.
Published on: Aug 18, 2025 09:05 PM
विनोद तावडेंनी जयंत पाटलांनंतर आणखी एका नेत्याची घेतली भेट, पवारांच्या
उद्धव ठाकरेंचा कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंबा? थेट सोनम वांगचूक यांना
भाजपसोबत जाणाच्या विचारात असलेल्यांना ठाकरेंचा सवाल; दानपेटीची चोरी...
भक्तीचा महासंगम! ज्ञानोबा-तुकाराम पालखीचे आगमन; वारकरी-धारकरी एकत्र
