Eknath Khadase on Shinde Government | शिंदे सरकार कोसळणार, एकनाथ खडसेंची शिंदे सरकारवर मोठं वक्तव्य
या संदर्भात येत्या १ तारखेला निर्णय आहेत. यातच सर्वोच्च न्यायालयात वेगवेगळ्या याचिका दाखल झालेल्या आहेत. घटनेच्या १० व्या परिशिष्टातील तरतुदींनुसार या पूर्वी अशाच प्रकरणांवर निर्णय झालेले आहेत.
मुंबई – आमदार एकनाथ खडसे यांची सरकारवर गंभीर टीका. राज्यातील शिंदे सरकार तरणार की कोसळणार, याबाबत सत्ताधाऱ्यापासून ते विरोधकांपर्यंत मते व्यक्त होत आहेत. शिंदे गट आणि शिंदे सरकारशी संबंधित प्रकरणे सर्वोच्च न्यायालयात असल्याने शिंदे सरकारवर टांगती तलवार असल्याचे बोलले जात आहे. या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसेचे नेते एकनाथ खडसे यांनी मत व्यक्त केले आहे. यापूर्वीही सर्वोच्च न्यायालयाने अशा प्रकरणांमध्ये राज्यघटनेतील तरतुदीनुसार दिलेले निर्णय पाहता हे सरकार कोसळू शकते, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केल आहे. या संदर्भात येत्या १ तारखेला निर्णय आहेत. यातच सर्वोच्च न्यायालयात वेगवेगळ्या याचिका दाखल झालेल्या आहेत. घटनेच्या १० व्या परिशिष्टातील तरतुदींनुसार या पूर्वी अशाच प्रकरणांवर निर्णय झालेले आहेत.
Published on: Jul 30, 2022 10:33 AM
Latest Videos
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी

