Pahalgam | Eknath Shinde | उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा दिलासा; पहलगाम हल्ल्यातील शहीद आदिल शहाच्या कुटुंबासाठी उभारलं नवं घर
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याला एक वर्ष पूर्ण झालं असलं तरी त्याचे परिणाम अजूनही कायम आहेत. या घटनेचा मोठा फटका स्थानिक पर्यटन व्यवसायाला बसला असून, पहलगाममधील सुमारे 50 टक्के हॉटेल्स अजूनही रिकामी आहेत. त्यामुळे हॉटेल उद्योगाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. गेल्या वर्षी बैसरन व्हॅलीत झालेल्या भीषण हल्ल्यात अनेक पर्यटकांचे प्राण वाचवण्यासाठी धाडसाने पुढे आलेले पोनी चालक आदिल हुसेन शहा शहीद झाले होते.
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याला एक वर्ष पूर्ण झालं असलं तरी त्याचे परिणाम अजूनही कायम आहेत. या घटनेचा मोठा फटका स्थानिक पर्यटन व्यवसायाला बसला असून, पहलगाममधील सुमारे 50 टक्के हॉटेल्स अजूनही रिकामी आहेत. त्यामुळे हॉटेल उद्योगाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. गेल्या वर्षी बैसरन व्हॅलीत झालेल्या भीषण हल्ल्यात अनेक पर्यटकांचे प्राण वाचवण्यासाठी धाडसाने पुढे आलेले पोनी चालक आदिल हुसेन शहा शहीद झाले होते. जीवाची पर्वा न करता त्यांनी पर्यटकांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्याचा प्रयत्न केला, मात्र दहशतवाद्यांच्या गोळीबारात त्यांना प्राण गमवावे लागले. त्यांच्या शौर्यामुळे अनेकांचे जीव वाचल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. आदिल यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले होते. ही बाब लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेत त्यांच्या कुटुंबासाठी पक्कं घर बांधून दिलं. सुमारे 10-12 लाख रुपये खर्चून उभारलेल्या या घरात हॉल, स्वयंपाकघर, दोन बेडरूम आणि स्वच्छतागृहाची सुविधा आहे.
आदिल यांचे वडील इक्बाल शहा यांनी पर्यटकांना पुन्हा येण्याचं आवाहन करत मुलाच्या बलिदानाचा अभिमान व्यक्त केला.
पहलगाम हल्ल्यातील शहीद आदिल शहाच्या कुटुंबासाठी उभारलं नवं घर
पश्चिम बंगालच्या निवडणुकीपूर्वीच ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का, नेमकं
महिला आरक्षणावरून राजकारण तापलं; खोटं कितीही बोललं तरी सत्य कायम राहतं
खरातच्या गुन्ह्यांचा अंतच नाही! नाशिकच्या सिन्नरमध्ये 15वा गुन्हा दाखल

