मुंब्र्याची शाखा नेमकी कोणाची… उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे गटाची?
tv9 Marathi Special Report : मुंब्र्याच्या शाखेवरून उद्धव ठाकरे विरूद्ध एकनाथ शिंदे गट असा सामना सुरू झाला आहे. मुंब्रा शाखेवरून ठाकरे गट कोर्टात जाणार असल्याचा इशाराही त्यांनी शिंदे गटाला दिला. मुंब्र्याच्या शाखेवरून आता उद्धव ठाकरे गटाने कोर्टात जाण्याची तयारी केली आहे.
मुंबई, १४ नोव्हेंबर २०२३ | मुंब्र्याच्या शाखेवरून आता उद्धव ठाकरे गटाने कोर्टात जाण्याची तयारी केली आहे. सध्या शिंदे गटाने ही शाखा पाडून नव्याने बांधकाम सुरू केले आहे. यावर ठाकरे गटाने आक्षेप नोंदविला आहे. मुंब्र्याच्या शाखेवरून उद्धव ठाकरे विरूद्ध एकनाथ शिंदे गट असा सामना सुरू झालाय. शनिवारीच उद्धव ठाकरे गटानं शिंदे गटाने पाडलेल्या शाखेची पाहणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना परतावं लागलं पण आता उद्धव ठाकरे गटाने याच शाखेवर दावा करत कोर्टात जाण्याचा इशारा दिलाय आणि कोर्टात धाव घेतली. २ नोव्हेंबरला शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी शाखेवर ताबा घेतला. यानंतर शिंदे गटानं बुल्डोझरने शाखा पाडून कंटनेर आणून शाखा उभी केली. आता शिंदे गटाकडून नव्यानं शाखेचं बांधकाम हाती घेण्यात आलंय. पण नेमकी ही शाखा आहे तरी कोणाची? बघा स्पेशल रिपोर्ट

मराठी सिनेसृष्टीतील सौंदर्य क्वीन अभिनेत्री, या नावाने आहे ओळख?

Tamannaah Bhatia : गोल्डन आऊटफिटमधील तमन्ना भाटियाचे खास फोटो, चाहते म्हणाले...

Sonam Kapoor Photos : निळ्या रंगाच्या आऊटफिटमधील सोनम कपूरचे ग्लॅमरस फोटो

अंकिता लोखंडे हिने फेकली मनारा चोप्रावर कॉफी

बॉलिवुड स्टार ऋतिक रोशनचं शिक्षण किती झालंय? जाणून घ्या

हळद जास्त खाल्ल्याने आरोग्याचं मोठं नुकसान, थेट किडनीवर...
Latest Videos