खडसेंना ट्रॅपची माहिती होती, मग.. ; रेव्ह पार्टी प्रकरणी गिरीश महाजनांची खोचक टीका
एकनाथ खडसे यांच्या जावयाला रेव्ह पार्टीमधून झालेल्या अटकेनंतर गिरीश महाजन यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
एकनाथ खडसेंना जर ट्रॅप माहिती होते तर त्यांनी जावईबापूंना कल्पना देण्याची गरज होती, असे होण्याची शक्यता आहे असे म्हणत सांभाळून राहण्याचा सल्ला त्यांनी द्यायला हवा होता. प्रत्येक वेळी तुमच्या संदर्भातच कसे षड्यंत्र असते? असा खोचक सवाल गिरीश महाजन यांनी उपस्थित केला आहे. एकनाथ खडसे यांच्या जावयाला पुणे पोलिसांनी एका रेव्ह पार्टीमधून अटक केली आहे. त्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यावर गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काहीही झाले तरी लोकांना दोष द्यायचा हे चुकीचे आहे. खेवलकर यांना तिथे कुणी बळजबरीने नेऊन बसवले नसेल ना. या प्रकरणी जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असंही यावेळी गिरीश महाजन यांनी म्हंटलं आहे.
यावर पुढे बोलताना गिरीश महाजन यांनी सांगितलं की, कालच एकनाथ खडसे यांनी माध्यमांसमोर बोलताना म्हटले की, चाळीस गावला इतके ड्रग्ज का मिळतात. इथेच का ड्रग्ज सापडतात असा सवाल केला होता. खडसे नेहमी ड्रग्ज विरोधात बोलत असतात पण आता त्यांचे जावईच सर्व उद्योग चालवत आहे, हे आज समोर आले आहे. हा विषय थोडा तपासाचा आहे, नेमके काय झाले हे आताच सांगता येणार नाही. पोलिस या संदर्भात चर्चा करत असतीलच. तपासानंतर सर्व काही समोर येईलच.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा

