मूल रडल्याशिवाय आई सुद्धा दूध पाजत नाही, गोपीचंद पडळकर नेमकं काय म्हणाले?
गेल्या 50 दिवसांपासून धनगर आरक्षणासाठी आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होतो, मोठा संघर्ष समाजाचा सुरू असल्याचे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हटले. तर धनगर समाजाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडून अपेक्षा आहेत. लोक आस लावून बसले आहेत योग्य तो निर्णय घ्यावा, असेही पडळकर म्हणाले.
मुंबई, २१ नोव्हेंबर २०२३ : गेल्या 50 दिवसांपासून धनगर आरक्षणासाठी आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होतो, मोठा संघर्ष समाजाचा सुरू असल्याचे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हटले. तर मूल रडल्याशिवाय आई सुद्धा दूध पाजत नाही, अशा ग्रामीण भागातील म्हणीचा दाखला देत धनगर समाजाच्या आरक्षणासाठीच्या भावना सरकारकडे पोहोचवण्याचं काम करत आहोत. सरकार आल्यापासून सातत्याने हे आंदोलनं सुरू असे गोपीचंद पडळकर म्हणाले. इतकंच नाहीतर सरकार यामधून नक्कीच चांगला मार्ग काढेल असा विश्वासही पडळकर यांनी व्यक्त केला आहे. तर धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय पूर्णतः वेगळा आहे. धनगर समाजाचा एसटी प्रवर्गामध्ये समावेश करा, अशी वेगळी मागणी करत नाही तर या प्रवर्गात आधीपासूनच धनगर समाज आहे. त्यामुळे धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी, अशी पडळकर यांनी मागणी केली आहे.

पिंपळ पाने आरोग्यासाठी खुप फायदेशीर आहेत. पाहा काय आहेत गुणधर्म

महिलांना कोणत्या गोष्टीचा सर्वात जास्त राग येतो, ज्यामुळे संसारही उध्वस्त होतात?

प्रत्येकाला माहित असावेत असे काही लाइफ हॅक्स (Life Hacks)

एवढी सुंदर गोल्फर कधीच पाहिली नसेल... तुम्ही पाहिलीय?

टीम इंडियाचा माजी खेळाडू पाक टीमचा कोच बनणार?

हनिमूनची रात्र घालवा 'या' बेस्ट ठिकाणी, पार्टनर कधीच विसरणार नाही ते 'गोल्डन' डेज्
Latest Videos