TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 11 AM | 1 July 2021
आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर टीका केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांकडून पडळकरांविरोधी घोषणा देण्यात आल्या. दरम्यान सोलापूरात एका अनोळखी इसमाने पडळकरांच्या गाडीवर हल्ला केल्यामुळे हा वाद आणखीच वाढला आहे.
आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील वाद शिगेला पोहोचला आहे. पडळकरांनी राष्ट्रावादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केल्यानंतर राष्ट्रावादी पक्षातून पडळकरांवर बऱ्याच टीका करण्यात येत होत्या. त्याच दरम्यान सोलापुरात पडळकरांच्या गाडीवर महाराष्ट्राचा बुलंद आवाज अशी घोषणा देत भला मोठा दगड टाकून एक व्यक्ती पळाला. पडळकर समर्थकांनी मोटारसायकलवर पाठलाग केल्यानंतर सुद्धा दगडफेक करणारा हाती लागला नाही. सोलापुरातील श्रीशैल्य नगर अक्क महादेवी मंदिर येथे ही घटना घडली. या घटनेनंतर दोन्ही पक्षातील वाद आणखी वाढला असून दोन्ही पक्षातील कार्यकर्त्ये आक्रमक झाले आहेत तर नेते देखील एकमेंकावर टीका करत आहेत.
Latest Videos
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

