Borivali | गोराईत ठाकरे सेनेचा आक्रमक पवित्रा! बॅरिकेट्स तोडून पोलिसांशी थेट संघर्ष
बोरीवलीतील गोराई परिसरात ठाकरे गटाच्या शिवसेनेने मँग्रोव्ह पार्क नागरिकांसाठी तात्काळ खुले करावे या मागणीसाठी जोरदार आंदोलन केले. हे आंदोलन सुरुवातीला शांत स्वरूपात सुरू झाले असले तरी काही वेळातच ते आक्रमक वळणावर गेले.

मँग्रोव्ह पार्क बाहेर पोलिसांकडून सुरक्षा म्हणून बॅरिकेट्स लावण्यात आले होते. मात्र आंदोलकांनी ते बॅरिकेट्स तोडून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये बराच वेळ चर्चा झाली, पण समाधानकारक तोडगा न निघाल्याने तणाव वाढला.
परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे दिसताच पोलिसांनी काही आंदोलकांची धरपकड सुरू केली. दरम्यान, ठाकरे गटाच्या युवा सेनेच्या वतीने मँग्रोव्ह पार्कचे प्रतीकात्मक उद्घाटनही करण्यात आले आणि त्यानंतर आंदोलन अधिक तीव्र करण्यात आले.
नागरिकांसाठी मँग्रोव्ह पार्क लवकरात लवकर खुले करावे, हीच प्रमुख मागणी या आंदोलनातून पुन्हा एकदा जोर धरत आहे.
Published on: Jun 03, 2026 12:46 PM
शरद पवारांची भेट, लगेच सुनेत्रा पवारांची भेट! काकडेंच्या दौऱ्याने...
बोगस SRA फॉर्म भरणं हाच मोदींनी दिलेला रोजगार! ठाकरेंचा भाजपवर घणाघात
दिशा सालियन प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही! ठाकरेंचं मोठं वक्तव्य
मारहाणीची कबुली देणारा हिंदुत्ववादी कार्यकर्ता मोकाट कसा? CJP आक्रमक