अभिनेता गोविंदा रुग्णालयात दाखल, स्वतःच्या हातून बंदुकीतून सुटली गोळी अन्…

मुंबईत पहाटे 5 वाजताच्या सुमारास गोविंदा घराबाहेर जात असताना त्याच्याकडे परवाना असलेली बंदुक तपासून पाहत होता. त्याचवेळी चुकून त्यातून गोळी मारली गेली. ही गोळी गोविंदाच्या गुडघ्याला लागली आहे, सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत

अभिनेता गोविंदा रुग्णालयात दाखल, स्वतःच्या हातून बंदुकीतून सुटली गोळी अन्...
| Updated on: Oct 01, 2024 | 11:03 AM

अभिनेता गोविंदाच्या हातातील बंदुकीतून मिसफायर झाल्याची बातमी समोर येत आहे. अभिनेता गोविंदाच्या बंदुकीतून चुकून गोळी सुटली आणि ती त्याच्या पायाला लागली आहे. या घडलेल्या घटनेनंतर त्याला मुंबईतील क्रिटीकेअर रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या गोविंदावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती बरी असल्याची माहिती मिळत आहे. आज मंगळवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास ही घटना गोविंदाच्या हातून घडली. गोविंदाकडे परवाना असलेली बंदुक आहे. मात्र ती तपासत असतानाच त्याच्याकडून चुकून त्या बंदुकीतून गोळी सुटल्याची माहिती समोर येत आहे. गोविंदा एका कामानिमित्त कोलकाताला जाण्यासाठी घरातून निघत होता. त्यावेळी तो नेहमीप्रमाणे परवाना असलेली बंदुक स्वत:सोबत घेत होता. ही बंदुक त्याच्या हातातून निसटली आणि त्यातून त्याच्या पायाला गोळी लागली. डॉक्टरांनी गोविंदाच्या पायातून गोळी काढली असून त्याची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.

Follow us
'कारण टायगर अभी जिंदा है...',अमोल कोल्हेंची फटकेबाजी, बघा काय म्हणाले?
'कारण टायगर अभी जिंदा है...',अमोल कोल्हेंची फटकेबाजी, बघा काय म्हणाले?.
उद्धव ठाकरेंवर अ‍ॅन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया, डॉक्टरांचा सल्ला काय?
उद्धव ठाकरेंवर अ‍ॅन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया, डॉक्टरांचा सल्ला काय?.
भाजप आमदारासमोर महिलांना वाटलेल्या साड्या मराठा आंदोलकांनी पेटवल्या अन
भाजप आमदारासमोर महिलांना वाटलेल्या साड्या मराठा आंदोलकांनी पेटवल्या अन.
UP च्या बहरइचमध्ये देवी विसर्जनावेळी गोळीबार, संतप्त जमावाकडून जाळपोळ
UP च्या बहरइचमध्ये देवी विसर्जनावेळी गोळीबार, संतप्त जमावाकडून जाळपोळ.
सिद्दीकींच्या हत्येचा कट याच घरात शिजला; बघा एक्सक्ल्युझिव्ह व्हिडीओ
सिद्दीकींच्या हत्येचा कट याच घरात शिजला; बघा एक्सक्ल्युझिव्ह व्हिडीओ.
बाबा सिद्दीकींसह झिशान यांच्याही हत्येचा होता कट, आरोपींची मोठी कबुली
बाबा सिद्दीकींसह झिशान यांच्याही हत्येचा होता कट, आरोपींची मोठी कबुली.
राज ठाकरे राजकीय सस्तन प्राणी, जे साडेचार वर्षे..अंधारेंची बोचरी टीका
राज ठाकरे राजकीय सस्तन प्राणी, जे साडेचार वर्षे..अंधारेंची बोचरी टीका.
आचारसंहितेपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयाचा धडाका, 19 निर्णय जारी
आचारसंहितेपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयाचा धडाका, 19 निर्णय जारी.
सरकारकडून टोलमाफी अन् राज ठाकरे म्हणाले, 'ही आनंदाची बाब, पण फक्त...'
सरकारकडून टोलमाफी अन् राज ठाकरे म्हणाले, 'ही आनंदाची बाब, पण फक्त...'.
सरकारकडून टोलमाफी अन् मनसेचा एकच जल्लोष; अविनाश जाधव म्हणाले...
सरकारकडून टोलमाफी अन् मनसेचा एकच जल्लोष; अविनाश जाधव म्हणाले....