“पक्ष वाढवायचा असेल, म्हणून केसीआर लोकं घेतायेत”, गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे दोन दिवसांसाठी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. संपूर्ण मंत्रिमंडळासह केसीआर राव पंढरपुरात आले आहेत. केसीआर आज महाराष्ट्रात असल्याने मोठ्या घडामोडी घडत आहेत. काही पक्षप्रवेशही या दौऱ्यात होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
जळगाव: भारत राष्ट्र समिती पक्षाचे प्रमुख आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे दोन दिवसांसाठी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. संपूर्ण मंत्रिमंडळासह केसीआर राव पंढरपुरात आले आहेत. केसीआर आज महाराष्ट्रात असल्याने मोठ्या घडामोडी घडत आहेत. काही पक्षप्रवेशही या दौऱ्यात होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “आपल्या देशात लोकशाही आहे. त्यामुळे कोणत्याही पक्षाला कोणत्याही राज्यात पक्ष विस्तार करण्याचा अधिकार आहे. भारत राष्ट्र समिती पक्ष स्थापन झाल्यानंतर त्यांना पक्ष संघटन वाढवायचं असेल तर त्यांना लोकांना आपल्या पक्षात घ्यावंच लागेल. भारत राष्ट्र समिती पक्षामुळे सत्ताधाऱ्यांना फायदा होईल, असं वाटत नाही.”
Published on: Jun 27, 2023 10:24 AM
लाडक्या बहिणींसाठी साडीही परवडत नाही?; घोषणा मोठ्या... योजना बंद!
शिवसेना नेत्या शायना एनसी यांचं WhatsApp हॅक
एकाच क्षणात होत्याचं नव्हतं! शाळेच्या व्हॅनला ट्रेनची जोरदार धडक
अजितदादांनंतर अर्थखात्यासाठी जयंत पाटीलच सक्षम, तटकरे-पटेल....
