शिवसेनेला जेमतेम 4 जागा, त्यातही… गुलाबराव पाटलांनी नराजीच्या सुरात सगळंच सांगितलं
विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर महायुतीतील नाराजी पुन्हा एकदा समोर आली आहे. भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत धुसफूस सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. जळगावची जागा भाजपकडे गेल्यामुळे मंत्री गुलाबराव पाटील नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यांनी माध्यमांशी बोलताना आपल्या भावना स्पष्टपणे व्यक्त केल्या.

गुलाबराव पाटील म्हणाले की, आम्ही गुवाहाटीला गेलो नसतो तर आजची परिस्थिती वेगळी असती. मोठ्या भावाने लहान भावाकडे नीट लक्ष द्यावे, अशी अपेक्षा सर्वांची असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच नाशिकमध्ये होत असलेली बंडखोरी महायुतीच्या भविष्यासाठी योग्य नसल्याचा सूचक इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, त्यांच्या एका वक्तव्याने विशेष लक्ष वेधलं. पुढे बोलताना त्यांनी म्हटले की, 5 जागांची सिटींग होती तरी शिवसेनेला जेमतेम 4 जागा मिळाल्या. त्यातही बंडखोरी होणे चुकीचे आहे. वरिष्ठांचा निर्णय मान्य करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
Published on: Jun 04, 2026 12:25 PM
शिवसेनेला जेमतेम 4 जागा, त्यातही... गुलाबराव पाटलांनी नराजीच्या सुरात
निवडणुकीआधीच बावनकुळेंचा मोठा दावा! सर्व बंडखोर माघार घेणार; 17 पैकी..
मोठी खळबळ! संजय राऊतांचा cockroach janata party च्या आंदोलनाला पाठिंबा
विधान परिषद, राज्यसभा बंदच करा! संजय राऊतांचा संताप....