आम्ही भीक घालत नाही, आव्हाडांनी मुंब्र्याकडे लक्ष द्यावं; शिंदे गटाच्या नेत्याचा खोचक सल्ला
विधानपरिषदेच्या निवडणुकीत मतं मिळवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पैसे वाटले असे वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केले होते. यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर देत आव्हाडांना टोला लगावला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी त्यांचा ठाण्याच्या मुंब्रा येथील जागेकडे लक्ष द्यावे, असा खोचक सल्ला गुलाबराव पाटलांनी दिला.
आमचे यश पाहिल्यावर यांच्याकडे एकच विषय आहे तो म्हणजे आम्ही पैसे वाटले. दुसरा यांच्याकडे कुठल्याही विषय नाही, त्यांच्या गोष्टींना भीक घालणारे आम्ही माणसं नाही, असं थेट म्हणत शिंदेंच्या शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी विरोधकांची बोलती बंद केली आहे. आम्ही केलेल्या कामांवर लोकांसमोर जाणारे आणि कामांच्या आधारावर मतं मागणारे लोकं आहोत. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांनी त्यांचा ठाण्याच्या मुंब्रा येथील जागेकडे लक्ष द्यावे, असा खोचक सल्ला गुलाबराव पाटलांनी दिला. विधानपरिषदेच्या निवडणुकीत मतं मिळवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पैसे वाटले असे वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केले होते. यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर देत आव्हाडांना टोला लगावला आहे. पुढे गुलाबराव पाटील लाडकी बहीण योजनेवर बोलताना म्हणाले, हीच योजना नाही तर आतापर्यंत अनेक योजना तसेच शासन निर्णय बघितला तर सर्वात जास्त काम करणारा हे सरकार आहे. विकास काम आणि योजनांचा जर विचार केला तर हे पळणारे आणि धावणारे सरकार आहे.
Published on: Jul 16, 2024 05:18 PM
शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा पवारांना फोन; भेटून सविस्तर बोलू..
मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची...
महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा
रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड काय झाली चर्चा?
