AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Special Report | Gunaratna Sadavarte यांच्या इमारतीतल्या लोकांकडून मोठे आरोप-tv9

Special Report | Gunaratna Sadavarte यांच्या इमारतीतल्या लोकांकडून मोठे आरोप-tv9

| Updated on: Apr 18, 2022 | 10:15 PM
Share

जे सदावर्ते महिन्याभरापूर्वी वकिल म्हणून कर्मचाऱ्यांची केस लढत होते., त्याच सदावर्तेंना आता वेगवेगळ्या दाखल गुन्ह्यांसाठी वकिल शोधावे लागणार आहेत. जे सदावर्ते एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसोबतच नेत्यांवरचे आरोप, भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवरुन सरकारवर डझनभर आरोप करत होते. त्याच सदावर्तेंविरोधात आता डझनाच्या हिशेबानं तक्रारी समोर येतायत.

वेळ कशी बदलते, याचं चांगलं उदाहरण सध्या गुणरत्न सदावर्तेंची अवस्था आहे. जे सदावर्ते महिन्याभरापूर्वी वकिल म्हणून कर्मचाऱ्यांची केस लढत होते., त्याच सदावर्तेंना आता वेगवेगळ्या दाखल गुन्ह्यांसाठी वकिल शोधावे लागणार आहेत. जे सदावर्ते एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसोबतच नेत्यांवरचे आरोप, भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवरुन सरकारवर डझनभर आरोप करत होते. त्याच सदावर्तेंविरोधात आता डझनाच्या हिशेबानं तक्रारी समोर येतायत. सुनावणीआधी आजही सदावर्ते आझाद मैदानातल्या आंदोलनासारख्या आवेषानं घोषणा देतायत. मात्र दुसरीकडे त्यांच्यापुढचा अडचणींचा डोंगर मोठा होत चाललाय. एकीकडे सदावर्तेंवर गुन्ह्यांमागे गुन्हे दाखल होतायत. दुसरीकडे त्यांच्या पत्नी जयश्री पाटलांवरही कटात सहभागी आणि एसटी कर्मचाऱ्यांकडून ८० लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे. त्यात आता सदावर्ते मुंबईत ज्या क्रिस्टल टॉवरमध्ये राहतात.,तिथल्या रहिवाश्यांकडून सदावर्तेंविरोधात तक्रारींचा पाढा वाचला जातोय. सदावर्तेंच्या इमारतीत राहत असलेल्या एका महिलेनं जयश्री पाटलांवर अरेरावी आणि मारहाणीचा आरोप केलाय. त्याचा एक व्हिडीओ सुद्दा समोर आलाय.