एवढी काय रे आग लागली… गुणरत्न सदावर्ते यांचा उद्धव ठाकरे अन् अनिल परब यांच्यावर हल्लाबोल
गुणरत्न सदावर्ते यांचं नाव न घेता एसटी बँकेचा बोजवारा उडाला आहे, असा प्रश्न आज अनिल परब यांनी विधान परिषदेत मांडल्याचे पाहायला मिळाले. यावर वकील गुणरत्न सदावर्ते यांना विचारणा केली असता त्यांनी अनिल परब यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
मुंबई, ११ डिसेंबर २०२३ : हिवाळी अधिवेशनात ठाकरे गटाचे नेते, आमदार अनिल परब यांनी एसटी बँकेचा मुद्दा उपस्थित केला असून एका व्यक्तीच्या हट्टामुळे एसटी बँकेची अशी अवस्था झाली आहे, असे म्हणत अनिल परब यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्यावर आरोप केला आहे. गुणरत्न सदावर्ते यांचं नाव न घेता एसटी बँकेचा बोजवारा उडाला आहे, असा प्रश्न आज अनिल परब यांनी विधान परिषदेत मांडल्याचे पाहायला मिळाले. यावर वकील गुणरत्न सदावर्ते यांना विचारणा केली असता त्यांनी अनिल परब यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. इतकंच नाहीतर गुणरत्न सदावर्ते यांनी उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत त्यांना सुनावण्याचीही भाषा केली आहे. सदावर्ते म्हणाले, ‘सर्वात पहिले मला संपूर्ण हिंदुस्थान आणि महाराष्ट्राला सांगायचं आहे आणि अनिल आणि उद्धवला सुनवायचं आहे. उद्धव आणि अनिल तुम्ही वैचारिक दिवाळखोर झालात. तुम्ही बाळासाहेबांचे हिंदुत्व ज्यादिवशी सोडलं त्यादिवशी कष्टकऱ्यांसोबतची नाळ ही सोडली…’ बघा नेमकं काय म्हणाले…
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

