Ahilyanagar | उन्हाचा तडाखा वाढला, अहिल्यानगरमध्ये तापमान 41 अंशावर
अहिल्यानगर जिल्ह्यात उन्हाचा तडाखा तीव्र होत असून तापमानाने 41 अंश सेल्सिअसचा आकडा गाठला आहे. वाढत्या उष्णतेचा परिणाम जनजीवनावर स्पष्टपणे जाणवू लागला आहे. याचा परिणाम शिर्डी साई बाबा मंदिर परिसरातील भाविकांच्या संख्येवरही झाला असून, ती लक्षणीयरीत्या घटल्याचं दिसून येत आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे अनेक भाविक दर्शनासाठी येणं टाळत असल्याचं चित्र आहे.

दरम्यान, साईबाबा संस्थानकडून भाविकांना उन्हापासून दिलासा देण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मंदिर परिसरात ठिकठिकाणी मंडप उभारण्यात आले असून, दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी जमिनीवर गालिचे अंथरण्यात आले आहेत. तसेच, रांगेत उभ्या भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये देशभरातून मोठ्या संख्येने भाविक शिर्डीत येतात. मात्र, सध्या वाढलेल्या तापमानामुळे भाविकांची संख्या कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे.
Published on: Apr 17, 2026 04:05 PM
CBSE च्या पोर्टलवर मोठ्या सायबर हल्ल्याचा प्रयत्न, फक्त दोनच मिनिटांत
कचऱ्याने हैराण नागरिक आक्रमक; MIDC कार्यालयाबाहेर टाकला कचऱ्याचा ढीग,
ठाकरेंचा विश्वासू नेता हे काय बोलून गेला, बड्या खासदाराविषयी केलं सूचक
महागाईविरोधात ठाकरे सेनेचा एल्गार! भायखळ्यात रस्त्यावर उतरले शिवसैनिक