Mumbai Thane Helpline Number |राज्यात पवासाचं थैमान; हेल्पलाईन नंबर जारी; मुख्यमंत्र्याकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
मुंबई, ठाणे आणि पुण्यासह राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सोमवारी सकाळपासूनच मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले. विशेषतः ठाणे, कल्याण, पुणे आणि नाशिक परिसरात नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. काही भागांमध्ये वाहतुकीचा वेग मंदावला असून स्थानिक प्रशासन सतर्क झाले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. प्रवास करताना काळजी घ्यावी तसेच अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन त्यांनी केले. मध्य महाराष्ट्रातील सातारा, पुणे आणि नाशिक जिल्ह्यातील घाट परिसरात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
दरम्यान, ठाणे महापालिकेकडून हेल्पलाईन क्रमांकही जारी करण्यात आले आहेत. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी खालील क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. पनवेल महानगर पालिकेनेदेखील हेल्पलाइन नंबर जाहीर केला असून खालील नंबर डायल करावा. सतत सुरू असलेल्या पावसामुळे नागरिकांमध्ये सतर्कतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
बृहृन्मुंबई महानगरपालिका हेल्पलाईन क्रमांक – 1916
पालघर हेल्पलाईन क्रमांक – 02525 297474, +91 82379 78873
ठाणे महानगरपालिका हेल्पलाईन क्रमांक – 022-25364779, 0222530 1740, 91 93723 38827
ठाणे, आपत्ती व्यवस्थापन कक्ष – 1800-222-108/8657887101
पनवेल महानगरपालिका हेल्पलाईन क्रमांक – 02227458040/41/42
Published on: Jul 04, 2026 10:15 AM
राज्यात पवासाचं थैमान; हेल्पलाईन नंबर जारी; मुख्यमंत्र्याकडून नागरिक
कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचा माजोरडेपणा आला समोर
दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही; तुकाराम मुंडेंचा मोठा निर्णय
राष्ट्रवादी पक्ष नाही, टोळी आहे! खोतांचा घणाघात; महायुतीला सावध...