ऐसा नही करना है…. लोकसभा अध्यक्षांनी आष्टीकरांना पुन्हा शपथ घ्यायला लावली, पण का?
पुढील १० दिवस चालणाऱ्या कामकाजादरम्यान, लोकसभेचे हंगामी अध्यक्ष भर्तृहरी महताब यांनी आज नवनिर्वाचित खासदारांना शपथ दिली. यावेळी खासदारकीची शपथ देत असताना हिंगोलीचे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी लोकसभा अध्यक्षांनी रोखलं, नेमकं काय झालं?
सोमवारपासून १८ व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन सुरू झालं असून आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. पुढील १० दिवस चालणाऱ्या कामकाजादरम्यान, लोकसभेचे हंगामी अध्यक्ष भर्तृहरी महताब यांनी आज नवनिर्वाचित खासदारांना शपथ दिली. यावेळी खासदारकीची शपथ देत असताना हिंगोलीचे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी लोकसभा अध्यक्षांनी रोखल्याचे पाहायला मिळाले. नागेश पाटील आष्टीकर यांनी खासदारीची शपथ घेताना बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख केला. तसेच दत्त गुरू आणि आपल्या वडिलांचेही स्मरण केले. यावर लोकसभा अध्यक्षांनी आक्षेप घेत नागेश पाटील आष्टीकर यांना थांबवलं आणि आष्टीकरांना पुन्हा शपथ घेण्यास सांगितले. असं नाही चालत… खासदारीकीची शपथ घेताना जे लिहिलेलं आहे त्यानुसार शपथ घ्यावी, असं लोकसभा अध्यक्षांनी सूचना केली.
Latest Videos
Latest News