Mumbai Rain : मुंबईची दाणादाण, मे महिन्यात मुसळधार; सायन किंग्ज सर्कल, हिंदमाता भागात काय परिस्थिती बघा
पावसाची आज पहाटेपासूनच पुन्हा एकदा हजेरी पाहायला मिळत आहे. त्यामुळे मुंबईकरांचे चांगलेच हाल होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
रविवारी संध्याकाळपासून मुंबईत जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. तर कालपासून मुंबई आणि मुंबई उपनगरात होणाऱ्या पावसाने मुंबईकरांची चांगलीच दाणादाण उडवली आहे. मुंबईतील अनेक सखल भागात पावसाचं पाणी साचल्याने रस्ते वाहतुकीवर त्याचा परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईतील सायन किंग्ज सर्कल भागात गुडघाभर पाणी साचलं आहे. त्यामुळे गुडघाभर पाण्यातून वाट काढत मुंबईकरांना आपलं इच्छित स्थळ, कामाचं ठिकाण गाठावं लागत आहे. मे महिन्यातच मान्सूनने हजेरी लावल्याने मुंबईकरांची तारांबळ उडाली आहे. तर दुसरीकडे दादर हिंदमाता या भागात देखील पावसाचं पाणी साचल्याचे दिसतेय. यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. भारतीय हवामान खात्याने येत्या दोन ते तीन दिवसात मान्सून हजेरी लावणार असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र यापूर्वी पावसाने हजेरी लावल्याचे पाहायला मिळत आहे.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली

