Mumbai Local Train : अरे भाई ये क्या है… मुंबईची लाईफ-लाईन लिकेज, लोकलच्या डब्यातून पावसाच्या धारा, ही ट्रेन तुमची तर नाही ना?
Imd Monsoon Rain Forecast Mumbai rain update कसारा-आसनगाव-सीएसटी लोकलच्या डब्यामध्ये गळती लागल्याचे आज पाहायला मिळाले. डब्यात पावसाचे पाणी गळत असल्याने कसारा-आसनगाव-सीएसटी या लोकलने प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांचे मोठे हाल झाले आहेत.
मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी एक बातमी समोर येत आहे. कसारा-आसनगाव-सीएसटी लोकलच्या डब्यामध्ये गळती लागल्याचे आज पाहायला मिळाले. डब्यात पावसाचे पाणी गळत असल्याने कसारा-आसनगाव-सीएसटी या लोकलने प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांचे मोठे हाल झाले आहेत. कामाला जात असताना या लोकलने प्रवास करताना प्रवाशांना भिजत जावं लागलं. तर लोकलच्या डब्यामध्ये गळती लागल्याने प्रवासी लोकलमधून भिजत प्रवास करत असल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. गेल्या काही दिवसांपासून कल्याण, ठाणे आणि मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाने नागरिकांना चांगलंच झोडपून काढलं आहे. या मुसळधार पावसामुळे मुंबईची लाईफ लाईन म्हणून ओळखली जाणारी मुंबईची लोकल पूर्णतः विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले होत तर आज कसारा-आसनगाव-सीएसटी लोकलच्या डब्यामध्ये गळती लागल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
Published on: Jul 13, 2024 03:18 PM
शिंदे गटाकडे फक्त पैसा, विचार नाही!; ऑपरेशन टायगरवरून दानवेंचा घणाघात
मी जबाबदारी घेतो म्हणत चक्क... ओमराजे निंबाळकरांना दिल्लीला नेणारा बडा
गद्दारी कराल तर याद राखा!; खासदारांच्या फुटीच्या चर्चेत राऊतांचा इशारा
त्या प्रकरणासाठी ओमराजे निंबाळकरांवर दबाव, संजय राऊतांनी सांगूनच टाकलं
