राज्यात जादूटोण्याच्या माध्यमातून मुलींवरील अत्याचाराच्या घटनेत वाढ- रुपाली चाकणकर

आज पुण्यात एका महिलेला पुत्रप्राप्ती व्हावी यासाठी पीडित महिलेला सर्वांच्या समोर नग्न पद्धतीनं अंघोळ करण्यास भाग पडले. यासगळया प्रकारची राज्य महिला आयोगाने दाखल घेतली आहे.अशी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली आहे. मात्र यासगळ्यामध्ये समाजात प्रभावीपणे अंधश्रेद्धेच्या घटना घडूच नये यासाठी आपण प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

प्राजक्ता ढेकळे

|

Aug 22, 2022 | 4:33 PM

पुणे – जादूटोण्याच्या (Black Magic ) प्रकारामुळे राज्यात महिलांवर (Women) व मुलींवर होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. गेल्या पंधरादिवसापूर्वी नागपूरमध्ये आपल्या लहान मुलीचा मांत्रिकाच्या सांगण्यावरुन बळी दिला, तिच्या अंगात भूत आहे त्यामुळे तिला मारून टाकावे लागेल असे त्या मांत्रिकाने मुलीच्या आई-वडिलांम सांगितले होते. त्यानंतर औरंगाबादमध्येही एका भोंदू बाबाने डोक्यावर हात ठेवून आजार बरे करो असे सांगत लोकांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे . आज पुण्यात एका महिलेला पुत्रप्राप्ती व्हावी यासाठी पीडित महिलेला सर्वांच्या समोर नग्न पद्धतीनं अंघोळ करण्यास भाग पडले. यासगळया प्रकारची राज्य महिला आयोगाने (State Commission for Women)दाखल घेतली आहे.अशी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली आहे. मात्र यासगळ्यामध्ये समाजात प्रभावीपणे अंधश्रेद्धेच्या घटना घडूच नये यासाठी आपण प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें