Almatti Dam | अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला

पॉवर हाऊसच्या माध्यमातून 42 हजार 500 क्यूसेक गतीने विसर्ग सुरू आहे. एकूण अलमट्टी धरणातून 2 लाख क्यूसेक गतीने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

कोल्हापूर : कर्नाटकातील अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला आहे. सकाळी 8 वाजेपर्यंत 1 लाख 17 हजार 428 क्यूसेक गतीने विसर्ग सुरू होता. मात्र सकाळी 10 नंतर 1 लाख 57 हजार 500 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू होता. तर पॉवर हाऊसच्या माध्यमातून 42 हजार 500 क्यूसेक गतीने विसर्ग सुरू आहे. एकूण अलमट्टी धरणातून 2 लाख क्यूसेक गतीने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI