बापरे खतरनाक… एकाच रनवे वर दोन विमानं, एकाचं लँडींग अन् दुसऱ्याचं टेक ऑफ; नेमकं झालं काय? बघा VIDEO
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या रनवेवर जे घडायला नको ते घडलं... सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकतात की, एकाच रन वे वरून एक विमान लँड होतंय तर त्यावरूनच दुसरं विमान टेक ऑफ होतंय. नेमकं काय घडलं बघा व्हिडीओ
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर शनिवारी संध्याकाळी शेकडो विमान प्रवाशांचा जीव थोडक्यात बचावला. कारण छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या रनवेवर जे घडायला नको ते घडलं… सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकतात की, एकाच रन वे वरून एक विमान लँड होतंय तर त्यावरूनच दुसरं विमान टेक ऑफ होतंय. इंडिगो फ्लाइट 5053 विमानतळाच्या रनवे 27 वर उतरले तर एअर इंडियाचे फ्लाइट AI657 उड्डाण करत होते. हा अपघात दोन एअरबस A320neos मध्ये झाला. पण सुदैवाने कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही. एअर इंडियाचे विमान तिरुवनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर जाणार होते. व्हायरल व्हिडीओमध्ये एअर इंडियाचे विमान रेन वेवर वेगाने जात असल्याचेही पाहायला मिळत आहे.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

