CNG Price News | 12 दिवसांत चौथ्यांदा CNG महागलं! इंधन दरवाढीने सर्वसामान्यांचे कंबरडंच मोडलं, CNG चे आजचे दर काय?
अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावामुळे तसेच होर्मुज सामुद्रधुनी बंद झाल्याच्या पार्श्वभूमीवर जगभरात मोठं ऊर्जा संकट निर्माण झालं आहे. आखाती देशांतून होणारा कच्चं तेल आणि एलपीजी गॅसचा पुरवठा विस्कळीत झाल्याने भारतासह अनेक देशांमध्ये इंधन तुटवड्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. याचा थेट परिणाम आता सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर होताना दिसत आहे.

गेल्या काही महिन्यांपासून देशात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी गॅसचा तुटवडा जाणवत असून इंधन दरात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे महागाईचा आणखी भडका उडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या 12 दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ झाल्याने नागरिकांचं मासिक बजेट कोलमडलं आहे.
दरम्यान, पेट्रोल-डिझेलनंतर आता CNG दरातही पुन्हा वाढ करण्यात आली आहे. CNG च्या दरात प्रतिकिलो 2 रुपयांची वाढ झाली असून अवघ्या 12 दिवसांत चौथ्यांदा दरवाढ करण्यात आली आहे. मुंबईत CNG चे दर आता प्रतिकिलो 84 रुपयांवर पोहोचले आहेत. काल पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाल्यानंतर आज पुन्हा CNG महागल्याने वाहनचालकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे.
इंधन दरवाढीमुळे वाहतूक, शेती आणि दैनंदिन जीवनावरील खर्च वाढण्याची शक्यता असून सर्वसामान्य नागरिकांसमोर आर्थिक संकट अधिक गडद होत चालल्याचं चित्र आहे. दरम्यान, केंद्र सरकारकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
Published on: May 26, 2026 10:12 AM
अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं
अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... फडणवीस नेमकं काय म्हणाले?
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून शिंदेंचा ठाकरे गटावर...