जालना कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीचा आज निकाल; ‘या’ दोन माजी मंत्र्याची प्रतिष्ठा पणाला
Agricultural Produce Market Committee Election Result 2023 : युती विरूद्ध महाविकास आघाडी लढतीत कोण मारणार बाजी? पाहा...
जालना : काल काही कृषी उत्पन्न बाजार समितीची मतमोजणी पार पडली. तर आज उर्वरित बाजार समित्यांची मत मोजणी आज पार पडतेय. 78 बाजार समितींची मतमोजणी आज होईल. तर उरवरित 10 बाजार समित्यांची मतमोजणी आज होणार आहे. आज जालना जिल्ह्यातील पाच पैकी तीन कृषी उत्पन्न बाजार समितींची मतमोजणी सुरु आहे. मंठा, अंबड आणि आष्टी या तीन बाजार समितींमध्ये मतदान प्रक्रिया पार पडत आहे. मंठ्यामध्ये भाजप, शिवसेना यांची युती विरुद्ध महाविकास आघाडी अशी सरळ लढत होणार आहे. मंठा आणि आष्टी या ठिकाणी माजी मंत्री बबनराव लोणीकर आणि काँग्रेसचे माजी आमदार सुरेश जेथलिया, उद्धव ठाकरे गटाचे आसाराम बोराडे यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. तर अंबडमध्ये राज्याचे माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि भाजप आमदार नारायण कुचे यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?

