जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा भाषण करत होते, त्याचवेळी भीषण बॉम्बस्फोट अन्…
VIDEO | जपानचे पंतप्रधान किशिदा फुमिओ यांच्या प्रचारसभेत अज्ञाताकडून भीषण बॉम्बस्फोट; पंतप्रधान फुमिदो किशिदा यांच्या भाषणादरम्यान एकच खळबळ
टोकियो : जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्या भाषणावेळी एक धक्कादायक प्रकार घडला. जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा भाषण करत असताना भीषण बॉम्बस्फोट झाला आणि एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेतून किशिदा थोडक्यात बचावले असून त्यांना सुरक्षा रक्षकांनी सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. जपानचे पंतप्रधान किशिदा फुमिओ यांच्या प्रचारसभेत अज्ञात इसमाने बॉम्ब फेकला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून एका संशयतिला पोलिसांनी अटक केली असून अधिक तपास सुरू आहे. जपानमधील वाकायामा येथील सर्व रस्ते बंद करण्यात आले असून पोलीस अधिक तपास करत आहेत. पंतप्रधान फुमियो किशिदा हे निवडणूक प्रचाराच्या भाषणादरम्यान, अज्ञात व्यक्तीने त्यांच्या दिशेने बॉम्ब फेकला. बॉम्ब फेकताच सर्वत्र धूर पसरला. अचानक झालेल्या या प्रकाराने भाषण ऐकायला आलेले किशिदा समर्थ घाबरले आणि त्यांच्यात एकच भितीचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.
Published on: Apr 15, 2023 10:21 AM
पुण्यात 120 कर्मचाऱ्यांच्या कॉल सेंटरवर पोलिसांचा छापा!
नाशिक पाठोपाठ जळगावमधील बंडही शमलं; मात्र महायुतीतील नाराजी कायम
हर्षवर्धन सपकाळांविरोधातील तक्रारींची हायकमांडकडून दखल
भयंकर मोठ्या घोटाळ्याचा मुंबईत भांडाफोड! जन्मदाखल्यातील गैरप्रकाराचा
