Kalyan : कल्याणच्या रिसेप्शनिस्टला मारहाण केल्याच्या प्रकरणात मोठी अपडेट, आरोपी आता 14 दिवस…
कल्याणमधील मारहाण प्रकरणात आरोपी गोकुळ झा आणि त्याचा भाऊ रणजीत झा यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. यापूर्वी त्यांना २ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली होती. हे प्रकरण कल्याणमधील एका रुग्णालयात रिसेप्शनिस्ट असलेल्या तरुणीला मारहाण केल्याबद्दल आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण समोर आले होते.
कल्याण येथील खासगी रूग्णालयातील रिसेप्शनिस्ट तरूणीला मारहाण केल्याच्या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर येत आहे. आरोपी गोकुळ झा आणि रणजीत झा या दोघांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपी गोकुळ झाने पत्रकाराना देखील धमकी दिल्याची माहिती समोर येत आहे. इतकंच नाहीतर पोलिसांसोबतही त्याची आरेरावी पाहायला मिळाली. दरम्यान, कल्याण सत्र न्यायालयाने आरोपी गोकुळ झा याला न्यायालयात कोठडी सुनावल्यानंतर त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.
कल्याण येथील नांदिवली परिसरात असणाऱ्या एका खाजगी रूग्णालयात रिसेप्शनिस्ट म्हणून काम करणाऱ्या मराठी तरूणीला एका परप्रांतीय व्यक्ती गोकुळ झाने जबर मारहाण केली होती. या मुलीचे केस धरून तिला फरपटत ओढलं. इतकंच नाहीतर तिच्या छातीवर लाथा-बुक्क्या मारल्या यामध्ये तिला गंभीर दुखापत झाली आहे. याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. सध्या तिच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती मिळतेय.
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान

