कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजपचा उमेदवार निश्चित?;’या’ नेत्याचं नाव फिक्स सूत्रांची माहिती
कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजपचा उमेदवार निश्चित झाल्याची माहिती आहे. पाहा सविस्तर माहिती...
कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजपचा उमेदवार निश्चित झाल्याची माहिती आहे. मुक्ता टिळक यांच्या घरातील व्यक्तीला उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा होती. पण आता टिळक कुटुंबातील नव्हे तर दुसऱ्या नेत्याला भाजप उमेदवारी देणार असल्याची माहिती आहे. हेमंत रासने यांचे नाव निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती आहे. याची अधिकृत घोषणा संध्याकाळी दिल्लीतून होणार आहे. दरम्यान भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. तेव्हा त्यांनी याबाबत स्पष्ट विधान केलं नाही. तर नावांची यादी पाठवली आहे. पक्षश्रेष्ठी त्यातून एकाची निवड करतील. त्याची घोषणा लवकरच होईल, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
Published on: Feb 03, 2023 12:49 PM
Follow Us
Latest Videos
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
