भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी मनोज जरांगेंच्या आंदोलनावर बोलणे टाळले; नेमकं कारण…
किरीट सोमैया यांनी अनधिकृत फेरीवाले, बांगलादेशी मुस्लिम घुसखोर आणि पोलीस प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात तीव्र भूमिका घेतली आहे. त्यांनी पोलीस आणि नगरपालिका अधिकाऱ्यांना 24 तासांचा अल्टिमेटम देत, सरकारी कामात अडथळा आणणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. नेवासा येथील हल्ल्याचा संदर्भ देत, सोमैयांनी राज्यभरात कारवाईची मोहीम सुरू करण्याचा इशारा दिला.
भाजप नेते किरीट सोमैया यांनी नुकताच माध्यामंसोबत संवाद साधला. सोमैय्या हे अनेक विषयांवर आवाज उठवत असतात आणि भाष्य करत असतात. अशाता अता त्यांनी मनोज जरांगेंच्या आंदोलनाबाबबत बोलणंच टाळलं आहे. त्यांनी या विषयी उत्तर न दिल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे. याव्यतिरिक्त त्यांनी इतर विषायांवर सविस्तर भाष्य केलं. महाराष्ट्र राज्यातील अनधिकृत फेरीवाले, बांगलादेशी मुस्लिम घुसखोर आणि पोलीस व स्थानिक प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. त्यांनी पोलीस आणि नगरपालिका अधिकाऱ्यांना 24 तासांचा अल्टिमेटम देत, सरकारी कामात अडथळा आणणे, पोलिसांना धक्काबुक्की करणे यांसारख्या गुन्ह्यांसाठी तातडीने गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. यामागे असलेल्या माफिया किंगवरही कारवाई झाली पाहिजे असे त्यांचे म्हणणे आहे.
नेवासा येथे घडलेल्या हल्ल्याचा संदर्भ देत, सोमैयांनी पोलीस उपस्थित असतानाही हल्ले होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. त्यांनी असा इशारा दिला की, 24 तासांत कारवाई न झाल्यास ते स्वतः आंदोलन करतील आणि राज्यभरात बांगलादेशी घुसखोरांविरोधात मोहीम राबवतील. रस्त्यांवरून तीर्थक्षेत्राकडे जाणाऱ्या भाविकांना अडवणाऱ्या गुंडांवरही कारवाईची मागणी त्यांनी केली. आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्या कोणताही मुस्लिम भारतात नको या वक्तव्यावर सोमैयांनी स्पष्टीकरण देत, देशाप्रती सन्मान असलेल्या मुस्लिमांचा आदर असल्याचे म्हटले, परंतु गुंडगिरी करणाऱ्यांना स्थान नसल्याचे ठामपणे सांगितले.
Published on: Aug 30, 2026 05:15 PM
भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी मनोज जरांगेंच्या आंदोलनावर बोलणे टाळले;
एकनाथ शिंदेंच्या मेळाव्यात मराठा आंदोलकांचा गोंधळ; अचानक...
अमराठी रिक्षा चालकांना मराठीसाठी वर्षभराची मुदत; शिवसेनेची नाराजी?
मनोज जरांगे पाटलांच्या मागण्यांबाबत सचिन अहिरांचं मोठं विधान,

