Kolhapur : गालावरच्या तिळानं केला घात, पत्नी समजून दुसरीवर अंत्यसंस्कार, ती पुन्हा आली अन् उडाली खळबळ
अंत्यसंस्कार केलेली महिला आज गावात हजर झाल्याने खळबळ माजलीये. पत्नी समजून दुसऱ्याच महिलेवर अंत्यसंस्कार केल्याचं उघड झालाय. कोल्हापूरच्या जयसिंगपूर मधल्या घटनेने गावकऱ्यांसोबत पोलीस सुद्धा चक्रावलेत. नेमक्या कोणत्या महिलेवर केले अंत्यसंस्कार याचा शोध सध्या सुरू आहे.
जयसिंगपूर शहरात पत्नी समजून एका व्यक्तीने दुसऱ्याच महिलेवर अंत्यसंस्कार केलेत. जयसिंगपूर शहरातून 37 वर्ष महिले बेपत्ता झाली. जयसिंगपूर पोलिसात पतीने पत्नी बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली. 10 दिवसांनी मिरज तालुक्यातील नीलजी बामणे गावातल्या नदीपात्रात एका महिलेचा सडलेला मृतदेह पोलिसांना आढळला. खात्री करण्यासाठी बेपत्ता महिलेच्या पतीला पोलीस ठाण्यात बोलावण्यात आलं. गालावरील तीळ आणि साडी पाहून मृतदेह आपल्या पत्नीचा असल्याचं पतीनं सांगितलं. मृतदेह ताब्यात घेऊन स्मशानभूमीत पाहुण्यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार झाले. पाहुणे मित्रमंडळी सांत्वनासाठी घरी गर्दी करू लागले. कुटुंब दुःखात बुडाले असताना अचानकपणे बेपत्ता महिला बचत गटातल्या कर्जांचा हप्ता भरण्यासाठी हजर झाली त्यामुळे अख्खं गाव चक्रावून गेलं.
मृतदेह सापडलेल्या महिलेच्या गालावर तीळ होता तसाच तीळ संबंधित व्यक्तीच्या पत्नीच्या गालावरही होता. त्यामुळे दुसऱ्याच महिलेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ या कुटुंबावर आली आहे. दरम्यान ज्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले तो मृतदेह नेमका कुणाचा याचा शोध आता सुरू झालाय.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?

