Vaibhav Khedekar : आवंढा गिळला, डोळे पाणावले… ‘माझ्या 20 वर्षांच्या निष्ठेचं सर्टिफिकेट’, मनसेतून बडतर्फ अन् राज ठाकरेंचा शिलेदार भावूक
रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधील मनसेचे कोकण संघटक व राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र यावर वैभव खेडेकर यांनी स्पष्टीकरण दिलंय.
बडतर्फ हे माझ्या २० वर्षंच्या निष्ठेचं सर्टिफिकेट असल्याचे वक्तव्य करत मनसेचे माजी नेते वैभव खेडेकर यांनी खंत व्यक्त केली. भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांची भेट घेतली म्हणून मी भाजपात जाणार, अशा चर्चा सुरू झाल्या आणि या शंकेने माझी हाकलपट्टी करण्यात आली, असं वैभव खेडेकर यांनी म्हटलं तर आजपासून माझ्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं इंजिन थांबवलं गेलं याचं दुःख असं म्हणत वैभव खेडेकर हे माध्यमांसमोर भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. तर माझ्या मित्राच्या एका कामासाठी भाजप मंत्री नेते नितेश राणे यांची भेट घेतली असल्याचे स्पष्टीकरण वैभव नाईक यांनी दिलंय.
वैभव खेडेकर यांनी नुकतीच काल भाजपचे नेते आणि मंत्री नितेश राणे यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे पाहायला मिळाले. तर वैभव खेडेकर यांचा भाजप प्रवेश निश्चित झाल्याच्या चर्चा कोकणात खुलेआम सुरू झाल्यात होत्या. मात्र या चर्चांदरम्यान, मनसे पत्रातून वैभव खेडेकर यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?

