‘नगरपरिषद सीईओ सत्तार यांच्याकडे चप्रशाचं काम करतायत’, ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल
गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळे आरोप होत आहे. नियम व अटी डावलून मर्जीतील दोन कंपन्यांच्या घशात तब्बल 150 कोटी रुपयांचे कंत्राट घालण्यात आल्याचा आरोप कालच झाला होता. तोच आता चिमणा राजा जागा ताब्यात घेण्यावरून सत्तार अडचणीत येण्याची शक्यता आहे.
औरंगाबाद : कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. त्यांच्यांवर गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळे आरोप होत आहे. नियम व अटी डावलून मर्जीतील दोन कंपन्यांच्या घशात तब्बल 150 कोटी रुपयांचे कंत्राट घालण्यात आल्याचा आरोप कालच झाला होता. तोच आता चिमणा राजा जागा ताब्यात घेण्यावरून सत्तार अडचणीत येण्याची शक्यता आहे. औरंगाबाद महापालिकेची चिमणा राजाची जागेची केस खंडपीठांमध्ये सुरू असताना सुद्धा त्यावरील अतिक्रमण काठत त्यांनी ती ताब्यात घेतली. यावरून ठाकरे गटाचे नेते विधानपरिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी टीका केली आहे. त्यांनी, सत्तार यांनी सिल्लोडमध्ये प्रचंड जागा नगरपालिका वापरून ताब्यात घेतल्या आहेत. नगरपरिषद सीईओ अब्दुल सत्तार यांच्याकडे चप्रशाचा काम करतात अशी टीका केली आहे. तर चिमणा राजा जागा ताब्यात घेण्यासाठीच सत्तार यांचे अनेक खटाटोप सुरू असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तर आत्ताचे आयुक्त अब्दुल सत्तार यांना भीक घालत आहेत पण त्यांना कायद्यात राहून काम करावे लागेल असा टोला देखील त्यांनी लगावला आहे.
... तर नार्वेकरांना राजीनामा द्यावा लागेल! राऊतांनी स्पष्टच सांगितलं
देशाला गुलामीतून मुक्त करण्यासाठी टिपूने बलिदान दिलं! ओवैसींचं विधान
माझ्या नादी लागू नका; श्रीकांत शिंदेंचा गणेश नाईकांना इशारा
पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा, कार्यकर्ता जखमी

