Mira Bhayandar Leopard : मीरा-भाईंदर हादरलं, इमारतीत शिरलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न, बघा VIDEO
मीरा-भाईंदरमधील तलाव रोड परिसरातील एका इमारतीत बिबट्या शिरल्याने प्रचंड भीतीचे वातावरण आहे. वनविभाग, पोलीस दल आणि अग्निशमन दलासह विविध यंत्रणा बिबट्याला जेरबंद करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. बिबट्याने घरात घुसून काही रहिवाशांना जखमी केले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मानवी वस्तीत बिबट्याचा वावर वाढल्याने गंभीर चिंता व्यक्त होत आहे.
मीरा-भाईंदरमधील तलाव रोड परिसरातील एका इमारतीमध्ये बिबट्या शिरल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सकाळी आठ वाजताच्या सुमारास हा बिबट्या एका घरात घुसला आणि त्याने तीन ते चार जणांवर हल्ला करून त्यांना जखमी केले. यामध्ये एका पंचवीस वर्षीय मुलीचा समावेश असून, तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिचे लग्न ठरले असल्याची माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी, पोलीस, अग्निशमन दल आणि महानगरपालिकेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असून, इमारतीमधील अरुंद जागेमुळे रेस्क्यू ऑपरेशनमध्ये अडचणी येत आहेत. बिबट्या इमारतीच्या वरच्या मजल्यावर पायऱ्यांच्या आड लपल्याचे दिसून आले आहे. बेशुद्ध करण्याचे इंजेक्शन देण्यासाठी डार्ट्स तयार ठेवण्यात आले आहेत. पुणे, अहमदनगर आणि रत्नागिरीसारख्या इतर भागांनंतर आता मीरा-भाईंदरमध्ये मानवी वस्तीत बिबट्याचा वावर वाढणे ही गंभीर चिंताजनक बाब ठरली आहे.
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप
कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर
ही शेवटची निवडणूक.. ठाकरेंच्या भवितव्यावर भाजपच्या नेत्याचं मोठं विधान

