MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 4 August 2021

दुकानदारांना 50 हजार आणि टपरीसाठी 10 हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पूर्ण घर पडलं असेल तर 1 लाख 50 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला आहे,

पुरामुळे नुकसान झालेल्या प्रत्येक कुटुंबाला सानुग्रह अनुदान म्हणून 10 हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यता आला आहे. दुकानदारांना 50 हजार आणि टपरीसाठी 10 हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पूर्ण घर पडलं असेल तर 1 लाख 50 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला आहे, अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. या निधीपैकी मदतीसाठी 1500 कोटी रुपये, पुनर्बांधणीसाठी 3000 कोटी व बाधित क्षेत्रात सौम्यीकरण उपाययोजनांसाठी 7000 कोटी खर्चास देण्यास मान्यता देण्यात आली.

सानुग्रह अनुदान:- कुटुबांना कपडे तसेच घरगुती भांडी/वस्तु यांचे नुकसानीकरिता 48 तासांपेक्षा अधिक कालावधीसाठी क्षेत्र पाण्यात बुडले असण्याची अट शिथिल कन 5000/- रुपये प्रतिकुटुंब , कपडयांचे नुकसानीकरिता आणि 5000/- रुपये प्रतिकुटुंब, घरगुती भांडी/वस्तु यांच्या नुकसानीकरिता देण्यात येईल.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI